सईद सरकार आणखी ८०० फुटीरतावाद्यांची सुटका करणार?

0
5

सईद सरकार आणखी ८०० फुटीरतावाद्यांची सुटका करणार?
मसरत अलामला सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती मोहम्मद सईद सरकार लवकरच ८०० हून अधिक फुटीरतावाद्यांची सुटका करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती उघड झाली आहे.

नवी दिल्ली- मसरत अलामला सोडल्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील मुफ्ती मोहम्मद सईद सरकार लवकरच ८०० हून अधिक फुटीरतावाद्यांची सुटका करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती उघड झाली आहे. या विषयावरून विरोधकांनी सरकारला मंगळवारी धारेवर धरले. काश्मीरच्या राज्यपालांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालात ही बाब उघड झाली आहे.
राज्यसभेत सपाचे खासदार नरेश आगरवाल यांनी २६७ नुसार नोटीस देऊन फुटीरतावाद्यांच्या प्रश्नावर चर्चेची मागणी केली. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी केंद्र सरकारला विशेष अहवाल पाठवला आहे. एक ते दोन दिवसांत सईद सरकार आणखी ८०० फुटीरतावाद्यांची सुटका करणार आहे.
राज्यपालांनी याबाबतचा अहवाल पाठवला असल्यास त्यांनी मसरत आलमच्या सुटकेवरही स्वाक्षरी केल्याची शक्यता आहे. सईद सरकार भविष्यात कोणत्याही फुटीरतावाद्यांची सुटका करणार नाही याचे आश्वासन केंद्राने द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
मसरत अलामच्या सुटकेचे आदेशावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्याचे वृत्त खरे असल्यास हे काम राष्ट्रपती राजवटीच्या काळातच झाले असावे, असे कॉँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी सांगितले. तर अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी सांगितले की, जवळपास १० हजाराहून फुटीरतवाद्यांची सुटका जम्मू-काश्मीरमधून होणार आहे.