जनता परिवार एकत्र येणारच – नितीश कुमार

0
6

पाटणा – विखुरलेला जनता परिवार पुन्हा एकत्र येणार असून, ती प्रक्रिया सुरु आहे असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले.
जनता परिवाराच्या विलीनीकरणाबद्दल कोणतीही अनिश्चितता नसून, विलीनीकरणाची गाडी रुळावर आहे. विलीनीकरणाला फार वेळ लागणार नाही असे नितीश कुमार म्हणाले.
कौशल्य विकास कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विलीनीकरणाच्या बैठकीसंबंधी पुढची तारीख लवकरच ठरवली जाईल या बैठकीत सर्व काही स्पष्ट होईल असे नितीश कुमार यांनी सांगितले.
दिल्लीत असताना नितीश कुमारांनी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती. जनता परिवारात मुलायमसिंह यादव यांची महत्वाची भूमिका आहे.
२७ मार्चला लालूप्रसाद यादव, शरद यादव, मुलायमसिंह यादव आणि माझ्यामध्ये विलीनीकरणाबद्दल विस्तृत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या भेटीबद्दल विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, बिहारच्या विकासाच्या प्रश्नांवर माझी पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली. त्यांनी माझे सर्व म्हणणे ऐकून घेतले आणि लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.