झारखंडमधील चकमकीत दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान

0
5

लटेहर(झारखंड) – झारखंडमधील लटेहर जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले आहे. यावेळी चकमकीदरम्यान एक महिला नक्षलवादी जखमी झाली, .
जखमी नक्षलवादी महिलेला अटक करण्यात आली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती अधिकारी अजय लिंडा यांनी दिली. दरम्यान, दोन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
मध्यरात्री दोन वाजता ही चकमक सुरु झाली. चार वाजेपर्यंत ही चकमक सुरु होती. या चकमकीदरम्यान इतर १० नक्षलवाद्यांना पळ काढण्यात यश मिळाले.