71 जागांवर मतदानाला सुरुवात,शिर्डी,हमीरपूरात यंत्रात बिघाड

0
13

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.29: लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचे मतदानाला आज सोमवारी सुरवात झाली आहे.उत्तर प्रदेशातील हमीरपूरच्या बूथ क्रमांक 111 मधील मतदान थांबलं; ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यानं खोळंबा झाल्याचे वृत्त आहे.9 राज्यांमधील 71 जागांवर सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरवात झाली आहे. भाजपा आणि मित्रपक्षांच्या दृष्टीने चौथ्या टप्प्यातलं मतदान अतिशय महत्त्वाचं आहे. आज मतदान होत असलेल्या जागांपैकी सुमारे 67 टक्के जागा सध्या भाजपाकडे आहेत. त्या जागा राखणे ही भाजपाची प्राथमिकता आहे. त्याच वेळी गेल्या पाच वर्षांमध्ये बदललेल्या वातावरणाचा फायदा घेत, कॉँग्रेस, तसेच अन्य विरोधक भाजपच्या जागा खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या उर्वरित टप्प्यांमध्ये होत असलेल्या जागांच्या निवडणुकीमधून देशात कोण सरकार स्थापन करणार, हे निश्चित होणार आहे. 
आज मतदान होत असलेल्या 71 पैकी 56 जागा सध्या भाजपा आणि मित्रपक्षांकडे आहेत. तर 2 जागा काँग्रेसकडे आहेत. आज महाराष्ट्रातील 17, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील प्रत्येकी 13-13, पश्चिम बंगालमधील 8, मध्य प्रदेश आणि ओदिशातील प्रत्येकी 6-6, बिहारमधील 5 आणि झारखंडमधील 3 जागांवर आज मतदान होत आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील एकूण 54 जागांवर आज मतदान होत आहे. यातील तब्बल 52 जागा सध्या भाजपाकडे आहेत. मात्र गेल्या वर्षाच्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत भाजपानं या दोन्ही राज्यातील सत्ता गमवावी लागली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कौल देणारी ही राज्य काँग्रेसला ‘हात’ देणार की पुन्हा एकदा इथे ‘कमळ’ उमलणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मुंबई: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवर बजावला मतदानाचा हक्क

बिहार: केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी लाखिसराईत केलं मतदान

मुंबई: ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी वांद्र्यात बजावला मतदानाचा हक्क

राजस्थान: माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधराराजे यांनी झालवारमध्ये केलं मतदान

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांनी बजावला मतदानाचा हक्क

नंदुरबार- मतदार संघात सात ठिकाणी सखी मतदान केंद्र व सेल्फी पाॅईन्टस तयार करण्यात आले आहेत. सेल्फी पाॅईन्टस वर सेल्फी घेण्यासाठी मतदारांची गर्दी होत आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील सपत्नीक मतदान करण्यासाठी रवाना, तत्पूर्वी त्यांनी घेतले खिडकाळी मंदिरात जाऊन खिडकाळेश्वराचे दर्शन

शिर्डीतल्या साईनगरीत भल्या सकाळी नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. साईनाथ हायस्कूलमधील मतदान केंद्र क्रमांक 52 मधील यंत्रात बिघाड झाल्याने अद्याप या केंद्रावर मतदान सुरू झालेले नाही,

भाजपाच्या खासदार आणि उमेदवार पूनम महाजनांनी बजावला मतदानाचा अधिकार