चप्राड येथे गौण खनिजांची अवैध चोरी

0
14

लाखांदूर,दि.29 : वैनगंगा नदी खोऱ्यात असणाºया चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आले आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असून, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव लांबणीवर का गेले आहेत असा एकच प्रश्न नागरिकांत उपस्थित केला जात आहे. घाटांचे लिलाव झाले नसले तरी रेतीच्या मागणीत वाढ झाली आहे. चोरीच्या प्रकारातून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावातील रेतीची मागणी विदर्भातील अनेक जिल्ह्यात होत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी चप्राड परिसरातील नदी काठावरील गावात रेती माफीयांचा उदय झाला आहे.यात रेतीमाफियांनी महसूल आणि अन्य विभागाचे कर्मचारी यांचेसोबत साटेलोटे केली आहे.

प्राप्त माहितीच्या आधारे, चप्राड गावाच्या बाहेर तीन ते चार ठिकाणी रेतीची डम्पिंग झालेली पाहायला मिळालेली आहे. यात दिवसाढवळ्या डम्पींग यार्डात रेतीचा उपसा केल्यानंतर या रेतीची विल्हेवाट रात्रभर केली जात आहे, अशी माहीती नागरिकांनी दिली.
ट्रक व ट्रॅक्टरच्या नियमित आवाजामुळे आमची झोप उडाली आहे. चुलबंद नदी ते चप्राडच्या कडेला गावाशेजारी, तलावात, शेतात तसेच टोली येथे मस्जिदच्या बाजूला, गावात काही ठिकाणी व आणखी दोन ते तीन ठिकाणी रेती डम्पिंग झालेली दिसली. यामुळे शेतशिवारातून जाणारे पांदन रस्ते रेतीच्या ट्रकांनी उखडली आहेत.
या विषयी अधिक माहिती घेतली असता गावातीलच लोकांनी या अवैध धंद्यांत गुंतलेल्या लोकांची यादी दिली. त्यानुसार चप्राड मधील चार ते पाच लोक, लाखांदूरातील दोन आणि चप्राड- मेंढा येथील दोन अशा प्रकारे लोक गुंतलेले दिसल्याचे नागरिकांनी माहिती दिली. ते अधिक माहिती देतांना म्हणाले, की पहाटे चार वाजतापासून ते सकाळी नऊ वाजतापर्यंत दहा ते पंधरा ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेतीचा अवैध धंदा केला जातो. सदर काम हे राजरोसपणे चालू आहे परंतु महसूल अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत आणि ही वस्तूस्थिती चप्राड मधीलच नाही तर संपूर्ण तालुक्याची आहे.