सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पंतप्रधानांचे आमत्रण नाकारले

0
8

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून शनिवारी आयोजित डिनर पार्टीला उपस्थित राहाण्यास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी नकार दिला असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश आणि देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री या डिनर पार्टीत सहभागी होणार आहेत.

एक एप्रिल रोजी न्यायाधीश जोसेफ यांनी लिहिलेल्या पत्रात, ख्रिश्चन समुदायाचा महत्त्वाचा सण ‘ईस्टर’ मुळे डिनरमध्ये सहभागी होण्यास शक्य नसल्याचे कळवले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, ‘धार्मिक सुटीच्या दिवशी महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करायला नाही पाहिजे. दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद, ख्रिसमस ईस्टर हे त्या धर्मांसाठी महत्वाचे सण आहेत. तुम्हालाही माहित आहे, की दिवाळी, होळी, दसरा, ईद, बकरी ईद या दिवशी कोणतेही महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित केले जात नाही. मला जाणिव आहे, या कार्यक्रमासाठी (डिनर आणि न्यायाधीशांची परिषद) नव्याने आयोजन करण्याची वेळ निघून गेली आहे. पण भारताच्या धर्मनिरपेक्षतेचा एक पाईक असल्याच्या नात्याने मी निवेदन करतो की, अशा महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन करतानी या सणांचा सन्मान राखला गेला पाहिजे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मी माझी चिंता सर न्यायाधीशांकडेही व्यक्त केली आहे.