पत्रकारांशी बोलण्यास शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना बंदी

0
10

मुंबई – शिवसेनेने सध्या प्रसिद्धी मध्यमांशी बोलण्यास पोटनिवडणूक लढवत असलेल्या दिवंगत आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांना बंदी केली आहे.

कोणत्याही प्रसिद्धी माध्यमांशी तृप्ती सावंत यांनी बोलू नये, अशा सूचना त्यांना वरिष्ठांनी दिल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्यावतीने आमदार अनिल परब, वैभव नाईक अणि प्रवक्ते अरविंद भोसले यांनी बाजू मांडावी, अशा सूचनाही करण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. तर मॅडम प्रसार माध्यमांशी बोलत नाहीत, असे वक्तव्य आमदार अनिल परब यांनी केले आहे.

त्यामुळे तृप्ती सावंत यांच्या आवाज बंदीला एक प्रकारे दुजोराच मिळाला आहे. त्यामुळे प्रचाराची धामधूम सुरू असतानाही तृप्ती सावंत या प्रसार माध्यमांपासून दूर आहेत. त्यांना प्रसिद्धीपासून दूर ठेवण्यात आल्याचेही शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांने सांगितले आहे.