छत्तीसगडमध्ये नक्षली कमांडर ठार

0
4

वृत्तसंस्था
कोंडागाव,-छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत नक्षली कमांडर ठार झाल्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक मिणा यांनी सांगितले.
मटवाल गावाजवळ असलेल्या जंगलात नक्षलवादी सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिमेवर गेलेल्या पोलिसांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार करणे सुरू केले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात मिलिटरी कंपनी क्रमांक सहाचा सेक्शन कमांडर असलेला धरमू यादव हा नक्षलवादी ठार झाला, तर अन्य नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी ठरले.
घटनास्थळी धरमूचे शव तसेच एक पिस्तुल व चार काडतुसे पोलिसांच्या हाती लागली.