सरपंच-पती संस्कृती नष्ट झाली पाहिजे – मोदी

0
16

नवी दिल्ली–ग्राम पंचायतींमधील ‘सरपंच-पती’ संस्कृती मोडीत काढण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीमध्ये केले. राष्ट्रीय पंचायतीराज दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमात त्यांनी महिला सक्षमीकरण, गरिबी निर्मुलन, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती या विषयावर मार्गदर्शन केले.
मोदी म्हणाले, सरपंच-पती संस्कृती सर्वत्र पसरली आहे. कायद्याने महिलांना अधिकार दिले आहेत, तर ते वापरण्याची संधी त्यांनाच मिळालीच पाहिजे. त्यामुळेच सरपंच-पती संस्कृती मोडीत काढली पाहिजे आणि महिला सक्षमीकरणाला मदत केली पाहिजे.
महात्मा गांधींनी म्हटले होते की देश खेड्यांमध्ये वसतो. त्यामुळे ग्रामीण भागांचा विकास कसा होईल याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपल्याला आपल्या गावाबद्दल आदर वाटावा असे गाव निर्माण केले पाहिजे. पुढील पाच वर्षात गावांसाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे असे मोदींनी सांगितले.
यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावरही लक्ष वेधले. सध्या पंचायतींमध्ये सरपंच-पती संस्कृती दिसून येत आहे. ही संस्कृती नष्ट झाली पाहिजे. कायद्याने महिलांना सक्षम बनवले आहे. जेव्हा कायद्याने त्यांना अधिकार दिला आहे तर त्यांनाही संधी मिळायला हवी. सरपंच-पतीची संस्कृती नष्ट व्हायला हवी असे मोदी म्हणाले.