राज्यातील चार हजाराहून अधिक शाळा बंदच्या वाटेवर

0
10

मुंबई – हल्ली खाजगी शाळांकडे पालकवर्ग मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत असल्याने सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. यामुळे राज्यातील हजारो सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.यंदाच्या शैक्षिणक वर्षात एकट्या महाराष्ट्रातील तब्बल चार हजार सरकारी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. घटती पटसंख्या हे शाळा बंद पडण्यामागे महत्त्वाचे कारण आहे. या बंद होणा-या शाळांपैकी काही शाळांमध्ये पटसंख्या केवळ दहा आहे तर काही शाळांमध्ये तर केवळ एक अथवा दोन इतकीच पटसंख्या आहे.रायगड जिल्ह्यातील ५०० हून अधिक तर चंद्रपूर जिल्ह्यातील १०० हून अधिक शाळा या महिन्याभरात बंद होणार असल्याचे शैक्षणिक विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.नुकत्याच आलेल्या कॅगच्या अहवालानुसार २०१०-११ ते २०१३-१४ दरम्यान सरकारी शाळामधील विद्यार्थ्यांच्या भर्तीचे प्रमाण सात टक्क्यांनी घटले. मात्र त्याचवेळी खाजगी शाळांमधील भर्तीच्या प्रमाणात २१ टक्क्यांनी वाढ झाली.
हे जर असेच सुरु राहिले तर एक दिवस सर्व सरकारी शाळा बंद पडल्या तर ते नवल वाटू नये अशी प्रतिक्रिया एका शिक्षकाने यावेळी दिली.
राज्यातील सरकारी शाळांमधील पटसंख्या
१० हून कमी पटसंख्या असलेल्या शाळा – चार हजार
१०-१९ पटसंख्या असलेल्या शाळा – १३ हजार ४००
महाराष्ट्रातील एकूण सरकारी शाळा – ६४ हजार