अरविंद केजरीवाल हे तर नक्षलवादी- सुब्रमण्यम स्वामी

0
9

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि. १९ – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणजे नक्षलवादी असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. केजरीवाल यांनी कारण नसताना हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. केजरीवाल यांना जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात रस नसून महत्वाच्या विषयांवरून जनतेचे लक्ष हटवून दिशाभूल करण्याचा त्यांच्या प्रयत्न आहे, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.
‘निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासने आपण पूर्ण करू शकत नाही, याची केजरीवाल यांन जाणीव झाली आहे. मुळात ते एक नक्षलवादी आहेत, त्यांना सरकार चालवण्यात रस नाही ‘ असे ते म्हणाले. ‘ दिल्लीतील जनतेला वाय-फाय सारखी सामान्य सुविधा देण्याचे वचनही (त्यांना) पूर्ण करता आलेले नाही. ते फक्त या सर्वातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत’, अशी टीकाही स्वामी यांनी केली आहे. यापूर्वीही स्वामी यांनी अनेकवेळा केजरीवाल यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
दरम्यान हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलिन यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यापर्यंत पोचला असून आज केजरीवाल आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत