केंद्रीय मंत्र्यांना महिला अधिकारी म्हणते थांबा…

0
6

वृत्तसंस्था
पाटणा दि १९- येथील विमानतळावर एका महिला पोलिस अधिकाऱ्याने केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांना नियम तोडण्यापासून परावृत्त केल्याची घटना येथे घडली आहे. सोशल नेटवर्किंगवर या महिला ‘दबंग‘ अधिकाऱ्यावर काही वेळातच शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. रामकृपाल यादव हे केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांना घेण्यासाठी विमानतळावर गेले होते. विमानतळावर प्रवेश करण्यास मनाई असलेल्या ठिकाणावरून यादव यांनी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस निरीक्षकाने त्यांना प्रवेश करण्यापासून रोखले. या घटनेनंतर यादव यांनी आपली चूक मान्य केली.
यादव म्हणाले, ‘प्रवेश करण्यास मनाई असलेल्या ठिकाणावरून जाण्याचा प्रयत्न केला, ही माझी चूकच आहे. परंतु, घाईमध्ये असल्यामुळे माझ्या लक्षात आले नाही. मला प्रवेश करू दिला असता तर अधिकाऱ्याच्या नोकरीवर गदा आली असती.