बचावले 169 प्रवासी; विमानाच्या काचेला तडे

0
8

वृत्तसंस्था
लखनऊ दि १९- येथील अमौसी विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एअर इंडियाच्या दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या एआय 873 विमानाला एका पक्षाची धडक बसली, त्यामुळे कॉकपिटच्या काचेला तडा गेला. त्यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानातील 169 प्रवाशी सुखरुप आहेत.
विमानतळ अधिकारी शकील अहमद खान यांनी सांगितले, की कॉकपिटची काच बदलण्यात येत आहे. मात्र त्याला कमीत कमी पाच ते सात तास लागणार असल्याने प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे.