वाणिज्य शाखेतून शिवानी गौर प्रथम तर तृप्ती ढोमणे दितीय

0
16

भंडारा दि.२९– : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज बारावी परीक्षेचा आॅनलाईन निकाल घोषित केला. वाणिज्य शाखेतून जिल्हयातून कु. शिवानी सुरेंद्रसिंग गौर हिने प्रथम क्रमांक पटकाविला तर व्दितीय क्रमांक कु.तृप्ती काशिनाथ ढोमणे हिने पटकाविला. दोघेही भंडारा येथील नुतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आहेत. शिवानी गौर हिला ८८.७६ टक्के गुण मिळाले. तिचे वडील सु- रेंद्रसिंग गौर हे सीआयडीमध्ये पीएसआय आहेत तर आई गृहिणी आहे. तिला भविष्यात सी. ए. बनायचे आहे. कु.तृप्ती ढोमणे हिला ८६.७६ टक्के गुण मिळीले आहेत. तिचे वडील काशिनाथ ढोमणे विनोद विद्यालय टेकेपार/डोड. येथे सहा. शिक्षक असून दै. लोकजनचे जिल्हा प्रतिनिधी आहेत तर आई गृहिणी आहे. तिला भविष्यात सी. ए. बनायचे आहे. दोघांनीही आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या प्राचार्या श्रीमती तिवारी, प्राध्यापक श्रीवास्तव, श्रीमती पौराणिक, श्रीमती पेटकर, नदीम खान व आईवडिलांना दिले आहे. सर्व शिक्षकांनी दोघांचेही अभिनंदन केले आहे.