गुजरातच्या सोमनाथ मंदिरात केवळ हिंदूनाच प्रवेश !

0
8

वेरावल (गुजरात)-दि. ३ – पवित्र ज्योतिर्लिंग सोमनाथ येथील मंदिरात यापुढे फक्त हिंदूंनाच प्रवेश मिळणार आहे. मात्र, हिंदु सोडून इतर धर्मातील लोकांना मंदिरात प्रवेश करायचा असेल तर मंदिर ट्रस्टच्या कार्यालयाची विशेष परवानगी घ्यावी लागणार आहे. ही सूचना मंदिर परिसरात लावलेल्या बोर्डवर लिहण्यात आली आहे.श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिर हे हिंदू समाजातील लोकांचे पवित्र तिर्थधामांपैकी एक आहे. हे मंदिर अत्यंत पवित्र असल्याने या मंदिरात केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेश द्यायला हवा त्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची माहीती मंदिर ट्रस्टीतील एका अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. बिगर हिंदू समाजातील लोकांनाही मंदिरात प्रवेश करता येवू शकतो पण त्यांना त्याआधी परवानगी घेण्याची अट ठेवण्यात आली असून शिवरात्री व अन्य महत्वाच्या सणांच्यावेळी केवळ हिंदू समाजातील लोकांनाच प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही या अधिका-याने सांगितले.