गडचिरोलीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

0
13

गडचिरोली दि.४: येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर त्यांच्याच गटाच्या नगरसेवकांनी अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर गुरूवारी नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
या संदर्भात नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी सांगितले की, आपण सगळ्यांना माहितच आहे, नुकताच माझ्या विरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आले आहे. नगराध्यक्ष पदभार सांभाळता एक वर्ष एक महिना १४ दिवस पूर्ण झालेत. तरीही गटनेत्यांचे आदेश असल्याने आपण सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच ३ सप्टेंबर रोजी बुधवारला राजीनामा दिला.