काळे फासण्यावरून भाजपची सेनेवर टीका

0
11

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.१२- – सुधींद्र कुलकर्णी यांना चेहऱ्याला काळे फासण्याचा प्रकार “अन्याय्य” आहे असे सांगत “घटनेव्यतिरिक्त आपल्याला अधिकार असल्यासारखे काही गट स्वतःला वेगळे दाखवू पाहतात” अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी शिवसेनेवर टीका केली.

“लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सहमत वा असहमत होण्याचा अधिकार आहे. परंतु, अशा प्रकारच्या निषेधाचे समर्थन करता येणार नाही. हे लोकशाहीच्या मूळ मूल्यांच्या विरोधात आहे,” असे नक्वी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नवक्वी म्हणाले, “पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांबद्दल अशा पद्धतीने विरोध दर्शविणे बरोबर नाही. पाकिस्तानला आपण विविध विषयांवर अशा प्रकारे प्रतिक्रिया देण्याची ही पद्धत नव्हे.”