चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाचा मार्ग मोकळा

0
5

नागपूर दि.१२- – अनेक वर्षांपासून आश्‍नासनांवर रेंगाळलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या विदर्भ कार्यालयाचा मार्ग मोकळा झाला. येत्या चार महिन्यांच्या आत नागपुरात स्थापना होईल, अशी घोषणा सुप्रसिद्ध अभिनेते व महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी नागपुरात केली.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने गेल्या पाच दशकांमध्ये प्रथमच नागपुरात येथील विदर्भातील कलावंतांशी संवाद साधला. धंतोली येथील श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या बैठकीला नागपूरसह विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास दोनशे कलावंत उपस्थित होते. यावेळी विजय पाटकर यांच्यासह संचालक मंडळाच्या सदस्य तसेच अभिनेत्री अलका कुबल, उपाध्यक्ष दत्तप्रसाद आष्टेकर, कार्यवाह संजीव नाईक, दिलीप दळवी उपस्थित होते. नागपुरात कार्यालय व्हावे अशी मागणी या बैठकीतही अनेकांनी केली. त्यावर उत्तर देताना विजय पाटकर यांनी, “नागपुरात एक संपर्क कार्यालय तातडीने सुरू करण्याचा निर्णय झालेला आहे. यासंदर्भात येत्या तीन-चार महिन्यांत कार्यवाही पूर्ण करून कार्यालय सुरू करण्यात येईल,‘ असे जाहीर केले.