गोंदियाच्या राष्ट्रीय उज्वला गृह पुनर्वसन केंद्रातून १९ मुली झाल्या पसार

0
12

मुंबई देह व्यवसाय करताना पकडल्या गेल्या होत्या मुली
सुरक्षा रक्षकाला केली बेदम मारहाण

गोंदिया,दि.१२- गोंदियाच्या राष्ट्रीय उज्वला गृह पुनर्वषण केंद्रातून १९ मुली पसार झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पाच दिवसा आधीच महिला बाल विकास आयुक्ताच्या आदेशाने या १९ तरुणी व महिलांसह त्यांच्या दोन मुलांना गोंदियाच्या टीबीटोली परिसरातील राष्ट्रीय उज्ज्वला गृह पुनर्वषण केंद्रात ठेवण्यात आले होते. यात तीन तरुणी बांग्लादेश, एक बिहार, मुंबई, कोलकाता व उत्तरप्रदेशातील अशा १९ तरुणी व महिलाचा आहे.त्या पैकी दोन महिलांना प्रत्येकी एक अशी दोन बालकेही आहेत.
मुंबई येथे देहव्यवसायात अडकलेल्या मुलींचे पुनर्वसन व्हावे, यासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या १९ तरुणी गोंदियाच्या टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून दोन बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या. त्यामुळे उज्ज्वला संस्थेत व गोंदियाच्या पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. देह व्यवसाय करणाèया उडाली आहे. देह व्यवसाय करणाèयार्‍या तरुणी व महिलांना उच्च न्यायालयाने सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.उच्च न्यायालयाचा सन्मान करीत महिला बाल विकास आयुक्ताच्या आदेशान्वये ५ ऑक्टोबर २०१५ ला या १९ तरुणी व महिलांसह त्यांच्या दोन मुलांना येथील टीबीटोली परिसरातील राष्ट्रीय उज्ज्वला गृहात ठेवण्यात आले होते.नागपूर येथील न्यू एनर्जी बहुउद्देशीय संस्थाद्वारे संचालित ही संस्था मतिमंद, अनाथ, विधवा, परित्यक्ता व अनैतिक व्यापार करणाèयार्‍या महिलांच्या कल्याणासाठी काम करते.मोठय़ा शहरात देह व्यवसाय करताना पकडल्या गेलेल्या महिलांना सुधारण्यासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या महिलांना कांदिवली मुंबईच्या रेस्कू या संघटनेमार्फत गोंदिया राष्ट्रीय उज्ज्वला गृहात पाठविण्यात आले होते.तेथे त्यांना राहण्याच्या सोयीबरोबर यांना प्रशिक्षणही दिले जात होते.शनिवारी सायंकाळी त्या तरुणींनी पळण्याचा कट रचला व रात्री ८ वाजे दरम्यान या सुधारगृहात असलेला गार्ड योगेश गोरखडे हा नेहमीप्रमाणे या सुधारगृहाच्या सर्व खोल्यांचे दार बंद करीत असताना त्यातील एका तरुणीने त्याला बटाटे मागितले. गार्ड योगेश बटाटे काढण्यासाठी गेला असता त्यावेळी त्याच्या मागे असलेल्या तिघींनी त्याच्यावर पीठ टाकून आपल्या ओढणीने बांधून ठेवले.त्याला मारहाणही केली आणि त्याच्याजवळील किल्ल्या हिसकावून या मुली पसार झाल्या.या संदर्भात राष्ट्रीय उज्वला गृह पुनर्वसन केंद्राच्या संचालिका पोर्णिमा रंगारी यांनी गोंदियाच्या रामनगर पोलिसांत मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.त्या तक्रारीच्या आधारावर रामनगर पोलीस ठाण्यात सदर मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणाच तपास रामनगरचे ठाणेदार बाळासाहेब पवार स्वत करीत आहेत.