राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली एकत्र या-प्रदेश सेवादल उपाध्यक्ष वाऊ

0
17

गोंदिया दि.२४:आज स्वायत्य संस्थामध्ये मिळालेल्या ५0 टक्के आरक्षणाची सुरुवात राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी ३३ टक्के आरक्षण देऊन केली होती. युवकांप्रमाणे महिलांना वेगळा मंच मिळवून देण्यासाठी प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे यांनी युवती मंच स्थापित करुन १८ ते ३५ वयोगटातील युवतींची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक अडचणी त्याचबरोबर आरोग्याविषयी जागरुक राहण्याचा मंत्र दिला. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या या संघटनेत महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी प्रदेश सेवादलाच्या उपाध्यक्ष अर्चना वाऊ यांनी केले.
जिल्हा राष्ट्रवादी सेवादलाच्या पूर्णबांधणीसाठी व महिलांचे संगठन उभारण्याच्या दृष्टीने प्रदेश राष्ट्रवादीच्या सूचनेनुसार गोंदिया येथील राष्ट्रवादी भवनात सभा घेण्यात आली. या वेळी त्या मार्गदर्शन करीत होत्या. त्याचप्रमाणे जिल्ह्यात संघटना वाढविण्यासाठी आ. राजेंद्र जैन व वरिष्ठ मंडळींनी मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे होते.
याप्रसंगी प्रामुख्याने सेवादलचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जानबा मस्के, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, सेवादल अध्यक्ष गणेश बरडे, विद्यार्थी अध्यक्ष केतन तुरकर, तालुकाध्यक्ष कुंदन कटारे, छोटूभाऊ पटले, अखिलेश सेठ, कृष्णकुमार जायस्वाल, दिनेश हरिणखेडे, मदनलाल चिखलोंढे, शिव नेवारे, शैलेश वासनिक, जितेश टेंभरे, लता रहांगडाले, कुंदा चंद्रिकापुरे, कुंदा भास्कर, पूरण उके, गणाजी चव्हाण, धर्मराज रहांगडाले, गोकुल बोपचे, कुलदीप रिनाईत, मडामे, पीपराज फुले, शंकर टेंभरे, गंगाराम कापसे, छगन माने, महेंद्र बघेले, नारायण शेंडे, छन्नीलाल येळे, भिकराज नागपुरे, वामन गेडाम, अनिल दावणे, नामदेव बरईकर आदी उपस्थित होते.