राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन रविवारी

0
13

गोंदिया, दि.२४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोंदिया नगरचे शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव रविवारी २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुभाष शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. हरिभाउ सूर्यवंशी तर प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य अनिल पत्की उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन नगर संघचालक मिलींद अलोनी व नगर कार्यवाह बाळकृष्ण बिसेन यांनी केले आहे.