ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार : शिवसेना ओबीसी जिल्हाध्यक्ष रुपेश पावसकर

0
19

कुडाळ-     ओबीसींना आरक्षण न मिळाल्यास याला भाजप जबाबदार राहील आणि यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा शिवसेना ओबीसीचे जिल्हाध्यक्ष रुपेश  पावसकर यांनी दिला आहे. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा तातडीने द्यावा अशी मागणी करत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा रुपेश पावसकर यांनी दिला आहे. राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा त्यामाध्यमातून डाटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात द्यावे असा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने डाटा राज्य सरकारला द्यावा असे अपेक्षित आहे. मग आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. असे जर झाले नाही तर केंद्र सरकार वेळकाढू धोरण अवलंबत आहे असे गृहीत धरून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल यामुळे ओबीसींवर फार मोठ्या अन्याय होत आहे हा अन्याय दूर झाला नाही तर केंद्र सरकारच्या विरोधात जनआंदोलन उभारावे लागेल आणि याचा इंगा आम्ही येणाऱ्या निवडणुका घेऊन सरकारला त्याची जागा निवडणुकीच्या मतपेटीतून दाखवून देऊ असा इशारा रुपेश पावसकर यांनी केंद्रातल्या भाजप सरकारला दिला आहे.