तरुण गोगाई यांच्याविरोधात मानहानीचा दावा

0
11
गुवाहटी, दि. २२ – आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि माजी मंत्री हिमंता विश्वा शर्मा यांनी १०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे एका पत्रकार परिषदेत मंगळवारी सांगितले.
मुख्यमंत्री तरुण गोगाई यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात येत आहेत. त्यांनी शारदा घोटाऴा, लुईस बर्गर लाच प्रकरणाशी माझा संबंध जोडला असून काही दिवसापूर्वी मीडियाशी बोलतांना त्यांनी माझ्यावर अनेक गुन्हे प्रलंबित आहेत, असे सांगितले असल्याचे हिमंता विश्वा शर्मा म्हणाले.