वडिलांच्या तेराव्याचा खर्च टाळून दुष्काळग्रस्तांसाठी 33 हजारांची मदत

0
10

नागपूर : बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड गावातील गजानन जगदेवराव सरोदे यांनी वडिलांच्या निधनानंतर तेराव्याचा कार्यक्रम रद्द करून खर्चाची रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली. 33 हजार 100 रुपयांचा धनादेश श्री. सरोदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.

श्री. सरोदे यांचे वडील जगदेवराव पुंडलिकराव सरोदे यांचे 2 डिसेंबर 2015 रोजी निधन झाले. सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा तेराव्याचा कार्यक्रम रद्द करुन श्री. सरोदे यांनी त्यासाठीचा 33 हजार 100 रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला. श्री. सरोदे यांनी विधीमंडळात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेऊन या निधीचा धनादेश त्यांच्याकडे सुपुर्द केला. श्री. सरोदे याच्या सामाजिक बांधिलकीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.