अर्जुनी मोर. वि.का.से.सह.संस्थावर भाजपचा झेंडा

0
10

अर्जुनी मोर.दि.27-अत्यंत नावाजलेल्या अर्जुनी मोर. येथील विविध कार्यकारी संस्थेच्या २४ एप्रिल रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल चे 13 पैकी 11 उमेदवार निवडुन आले. मात्र, गेल्या 20 वर्षापासून अध्यक्ष पदावर विराजमान असणारे भाजपाचे दिग्गज नेते तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती लुनकरण चितलांगे यांचा आठ मतानी पराभव झाल्याने ” गड आला पण सिंह गेला ” असे म्हणण्याची वेळ भाजपवर आली आहे.
अर्जुनी, निलज व मोरगाव या तिन गावामिळुन तयार झालेल्या अर्जुनी मोर. विविध कार्यकारी संस्थेत एकुन 13 सदस्य आहेत तर तिन्ही गावामिळुन 695 मतदार आहेत. या निवडणुकीत भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल चे 13 ,व काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित पॅनेल चे 13 आणी अपक्ष एक असे 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अपक्ष उमेदवार दुर्गाप्रसाद पालीवाल यांना 270 मते मिळाली त्यांचा केवळ एका मताने पराभव झाला. हे विशेष.चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत अनेक भाजपा, काॅग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून एकछत्री सत्ता गाजवणा-या भाजपाने यावेळेसही 13 पैकी 11 उमेदवार निवडुन आणुन निर्विवाद बहुमत मिळविले आहे. भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल चे निवडुन आलेले उमेदवार लालाजी कापगते, मधुकर पर्वते,दुलीचंद लांजेवार, शंकर लोगडे, शिवराम लोधी, एकनाथ शहारे, रमेश शहारे, अनिल बागडे,महिला गटातून सुनंदा झोळे, श्रीमला डोंगरवार, तर ललीत बाळबुध्दे ( अविरोध )हे निवडुन आले आहेत. तर काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस समर्पित पॅनेल चे 13 पैकी केवळ दोनच उमेदवार भागवत झोळे, विठ्ठल गहाणे निवडुन आले. अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल चे तब्बल वीस वर्षे अध्यक्ष पद भुषविणारे भाजपाचे दिग्गज नेते तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती लुनकरण चितलांगे यांना मात्र मतदारांनी नाकारले असुन त्यांचा आठ मतानी पराभव झाला.तर काॅग्रेस चे दिग्गज उमेदवार अशोक कापगते व माजी नगराध्यक्ष किशोर शहारे यांचाही पराभव झाला. अपक्ष उमेदवार दुर्गाप्रसाद पालीवाल यांचा केवळ एका मताने पराभव झाला. हे विशेष.अध्यक्ष पदासाठी भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल चे एकनाथ शहारे व ललित बाळबुध्दे यांचे नावाची चर्चा सुरु आहे.भाजपा समर्पित ग्रामविकास पॅनेल च्या विजयासाठी जेष्ठ नेते नामदेव पाटील कापगते, शिवनारायण पालीवाल, नगरसेवक विजय कापगते, घनश्याम हातझाडे, व अन्य कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.