‘आमचे बाबूजी अनेकांचे जीवन दाते’-इंजी.रत्नदीप दहिवले

0
11

अर्जुनी मोर,दि.27-माझ्यासह अनेकांच्या जीवनात बाबूजींनी प्रज्ञा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वांच्या दारात’ ज्ञान सरिता’ पोहोचवण्याचे व खऱ्या अर्थाने इतरांचे जीवन फुलवणारे, सामान्य लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे ‘किमयागार’ आहेत. त्यांनी अत्यंत खडतर प्रवासात कोणत्याही वादळाला न जुमानता संघर्षातून समृद्धीकडे वाटचाल केली. आमची बाबुजी अनेकांचे जीवन दाते व समाजाचे मार्गदर्शक ठरले आहेत’असे कृतज्ञता पूर्ण भावोद्गार इंजिनीयर रत्नदीप दहिवले यांनी व्यक्त केले.
एरंडी नवेगाव बांध येथील दलित मित्र सुखदेवराव दहिवले यांच्या 75व्या अमृत महोत्सव व जीवन चरित्र प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रज्ञा शिक्षण संस्था अध्यक्ष मालिनी दहिवले भदंत संघ धातु,आमदार मनोहरराव चंद्रिकापुरे,मंजुषा चंद्रिकापुरे, अनिल दहिवले, उज्वला नागभिडे, प्रज्ञा भगत,इंजि. विजय मेश्राम साहित्यिक,आंबेडकरी विचारवंत चंद्रशेखर बांबोडे, सिनेअभिनेते ऋतुराज वानखेडे अभिनेत्री डॉक्टर सरोज पाटील ,अभिनेता चेतन गाढवे ,झाडीबोली चे अभ्यासक डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर,हिरामण लंजे, हंसराज रामटेके ,नूतन दहिवले,गजानन डोंगरवार , शिवनारायण पालीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मनेहर चंद्रिकापुरे म्हणाले की, सुखदेव दहिवले यांनी आपल्या कष्टाचे चीज करून संबंध विदर्भात आपल्या कार्याची छाप पाडली त्यांनी शिक्षण गंगेच्या माध्यमातून इतरांचे जीवन समृद्ध केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुखदेवराव दहिवले यांचे जीवन चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले
कार्यक्रमाचे संचालन प्रा. विलास रहांगडाले यांनी तर आभार प्राचार्य त्रिवेणी रत्नदीप दहिवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रज्ञा शिक्षण संस्था एरंडी नवेगाव बांध द्वारा संचालित सर्व शाखांचे व वसतिगृहातील कर्मचारी वृद्धांनी परिश्रम घेतले.