अॅड.उपराडे तिसर्यांदा आमगाव भाजपचे अध्यक्ष

0
14

गोंदिया,दि.१५: -भारतीय जनता पार्टी आमगाव तालुका मंडळाच्या अध्यक्षपदी तिसर्यांदा अॅड येशुलाल उपराडे यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली.आमगाव तालुका भाजप मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे व माजी जिल्हाध्यक्ष राकेश शर्मा यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत उपराडे यांची निवड करण्यात आली.अॅड.उपराडे यांनी आपल्या निवडीचे श्रेय पक्षाच्या सर्व सदस्यांना व वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.यावेळी माजी आमदार भैरसिहं नागपूरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती उपसभापती,सदस्य आणि बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.