खासदार प्रफुल पटेल रविवारला गोंदियात

0
9

गोंदिया,,दि.१५:-राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल येत्या रविवारला गोंदिया येथे आयोजित जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.येथील नमाद महाविद्यालय परिसरातील ऑडीटोरियम येथे दुपारी २ वाजता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची तसेच नवनिर्वाचित नगरपंचायत सदस्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे.याबैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंबधी पटेल माहिती देणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.