अपक्ष जि.प.सदस्य फडणविसांकडे दाखल,भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा

0
335

गोंदिया,दि.08ः- गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी येत्या 10 मे रोजी निवडणुक होऊ घातली आहे.निवडणुकीनंतर तब्बल 3 महिन्यांनी हि निवडणुक प्रकिया पार पडत असून 53 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपने 26 जागा जिंकल्या.मात्र सत्ता स्थापनेसाठी 27 चा आकडा पुर्ण करु शकली नाही.त्यातच भाजपच्या दोन बंडखोरांनी निवडणुक जिंकली.त्यापैकी एका उमेदवाराची नागपूर निवासी व एकाची गोंदिया निवासी नेत्यांने तिकिट कापल्याची चर्चा होती.त्यामुळे त्या अपक्षांनी आम्ही त्या दोघांच्या माध्यमातून पक्षाला सहकार्य करणार नाही अशी भूमिका आधी घेतली होती.त्यामुळे त्या दोन्ही नेत्यांना डावलून परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी या दोघांचीही गरज असल्याने भाजपच्या संघनेत्यांनी संघाचे कार्यकर्ते असलेले खासदार सुनिल मेंढे व तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांना ही जबाबदारी देत त्यांना सोबत घेण्याची जबाबदारी दिली होती.त्या नेत्यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर त्या दोन्ही अपक्षांना नागपूर येथे पार्लेमेंटरीबोर्डाच्या बैठकीआधी हजर करीत त्यांचे समर्थन भाजपला मिळवून घेतले आहे.त्यामुळे महाविकास आघाडी जी सत्तेची स्वप्न बघत होती,त्याच्या इच्छा आकांक्षेवर पाणी फेरले गेले आहे.या दोन्ही अपक्षांना सभापती दिले जाणार असून एकाला बांधकाम व अर्थ तर एकाला महिला बालकल्याण दिले जाणार असल्याचे वृत्त आहे.त्यातच गोंदियाच्या नेत्याला चपराक देण्यात येणार असल्याचे भाजपच्याच गटात बोलले जात असून हे 10 मे रोजीच स्पष्ट होणार आहे.परंतु एक आमदार व जिल्ह्यातील काही नेते मात्र जि.प.अध्यक्षपदासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्याती सदस्य लायकराम भेंडारकर यांच्यासाठी हट्ट धरुन बसल्याने एैनवेळेवर मात्र त्यामुळे भाजपमध्येही विचित्र काही घडले तर नवल राहणार नाही,असेही बोलले जात आहे.