भाजपचे जन स्वाभिमान अभियान : आंबेडकर चौकात धरणे आंदोलन

0
7

गोंदिया, : देशातील दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात काही दिवसापूर्वी काही देशविरोधी तत्वांनी भारत विरोधात नारेबाजी करून दहशतवादी समर्थित आंदोलन केले होते. त्यांच्या या कृत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नावाखाली काँग्रेस, साम्यवादी व त्यांच्या मित्रपक्षांनी समर्थन केले होते. हे अविवेकी व राजकीय दिवाळखोरीचे लक्षण असून आपण कुठल्या गोष्टीला समर्थन करतो, याचे भान त्यांना नाही. दहशतवाद्यांचे समर्थन व देशाविरोधात बोलणाèयांना जनता माफ करणार नाही. जनतेच्या स्वाभिमानाला धक्का पोहचविणाèया व त्याचे समर्थन करणाèयांना आता जनताच धडा शिकविणार असल्याचे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी केले.
ते भारतीय जनता पार्टीद्वारे आयोजित देशव्यापी जन स्वाभिमान अभियानांतर्गत आज २० फेबु्रवारी रोजी आंबेडकर चौकात धरणे आंदोलन व हस्ताक्षर अभियानाच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रामुख्याने आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे, केशवराव मानकर, भेरqसह नागपुरे, खोमेश्वर रहांगडाले, हरिश मोरे, विनोद अग्रवाल, सीता रहांगडाले, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, जि. प. सभापती छायाताई दसरे, माजी जि. प. अध्यक्ष नेतराम कटरे, संतोष चव्हाण, शहर अध्यक्ष भरत क्षत्रीय, ग्रामीण मंडळ अध्यक्ष छत्रपाल तुरकर, न.प. गटनेते दिनेश दादरीवाल, भाजयुमो जिल्हाध्यक्ष संजय कुलकर्णी, नंदकुमार बिसेन आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, आंदोलनादरम्यान राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी मंडपाला भेट देवून हस्ताक्षर मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. तसेच भारत माता व डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. याचप्रमाणे वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. कटरे तसेच अनेक संघटनेच्या वतीने जन स्वाभिमान अभियानाला समर्थन देत मंडपाला भेट दिली. संचालन जयंत शुक्ला यांनी केले.