कचारगड यात्रेला अनुदानाची प्रतीक्षा

0
12

सालेकसा ,दि.२०: आदिवासी             समुदायाचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे कोयापुनेम उत्सवाला आजपासून (दि.२०) सुरूवात झाली आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यातून आदिवासी बांधव कचारगड यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. संपूर्ण देशभरात ख्याती असलेल्या या उत्सवाच्या व्यवस्थापनासाठी आश्वासनानुसार आदिवासी विकास विभागाच्या अनुदानाची अपेक्षा असताना सध्यातरी कुठलेही अनुदान देण्यात आले नाही.परिणामी या विभागाप्रती प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी           कचारगड यात्रेच्या व्यवस्थेसाठी आदिवासी विकास विभागाने थोडेफार अनुदान दिले होते. यावर्षीची यात्रा सुरू झाली. परंतु सध्यातरी अनुदान देण्यात आले नाही. विशेष म्हणजे कचारगड ज्या क्षेत्रात येते त्या क्षेत्रातील लोकप्रतिनिधी देखील आदिवासी समुदायातूनच आहेत. एक दोन दिवसात या कार्यक्रमाला राज्याचे आदिवासी विकास मंत्री, राज्यमंत्री यांसह अनेक लोकप्रतिनिधी भेट देणार आहेत. दरम्यान त्यांच्या भेटी पूर्वीच अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आहे. आदिवासींच्या उथानासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रालयदेखील आहे. परंतु आदिवासी समुदायाचे ‘वुंâभ’ समजल्या जाणाNया कचारगड यात्रेकडे दुर्लक्ष का केले जाते. असा प्रश्न आदिवासी बांधवांनी उपस्थित केला आहे.