बीएसएफ परिसराच्या उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री

0
10

नागपूर : सीमा सुरक्षा दल निवासी परिसराच्या उभारणीसाठी शासन व प्रशासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

मांडवा बुटीबोरी परिसरात सीमा सुरक्षा दलाच्या वसाहत उभारणीच्या शिलान्यासाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, माजी आमदार विजय घोडमारे, सीमा सुरक्षा दलाचे अतिरिक्त महासंचालक रजनीकांत मिश्रा, महानिरीक्षक पीएसआर आंजनेयुलु, कमांडर विजय कायरकर आदी उपस्थित होते.

देशाला सर्व आंतरिक व बाह्य संकटापासून दूर ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल काम करते. भूकंप, नैसर्गिक आपत्ती, आंतरिक व सीमा सुरक्षा या बाबीकडे हे सुरक्षा दल विशेष लक्ष देते. याशिवाय भूकंपात विस्थापित झालेल्या जनतेच्या रक्षणासाठी सुद्धा हे दल काम करीत असते. अशा या दलाचा परिसर नागपूर जिल्ह्यात होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. सीमा सुरक्षा दलाची ही कॉलनी आधुनिक व्हावी यात शाळा, आरोग्य सेवा यासारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.