महागाई विरोधात युवक कॉंग्रेसने वाटल्या लालीपाॅप

0
8

 

नागपूर- गेल्या दोन वर्षापुर्वी केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने लोकांना दिलेली स्वप्ने आता दिव्यस्वप्न ठरु लागली असून वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यानाही बसू लागला आहे.या महागाईच्या विरोधात तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या निषेधार्थ नागपूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने आज शहरातील विविध पेट्रोलपंप व हातठेल्यावर आंदोलन करण्यात आले.या आंदोलनातशहरातील पेट्रोल पम्प, जिलाधिकारी कार्यालय, लिबर्टी टॉकीज चौक येथे विरोध निदर्शने करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायकल चालवून व लॉलीपॉप वाटून दरवाढीचा निषेध् करण्यात आला, विविध पेट्रोल पम्पांवर लॉलीपॉप वाटण्यात आले, या वेळी उपस्थित सामान्य लोकांनी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारचा शाब्दिक विरोध दर्शविला