सीईओ गावडे यांना जि.प.च्यावतीने निरोप

0
10

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गेल्या दीडवर्षापुर्वी रूजू झालेले  दिलीप गावडे यांची अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाल्याने त्यांना आज सोमवारला जिल्हा परिषदेच्यावतीने निरोप देण्यात आला.त्यांचा निरोप व सत्कार समारंभाचे आयोजन स्व.वसंतराव नाईक सभागृहात करण्यात आले होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे,शिक्षण व आरोग्य समिती सभापती पी.जी.कटरे,सभापती विमल नागपूरे,छाया दसरेअति.मुकाअ जयंवत पाडवी,वित्त लेखा अधिकारी रा.मा.चव्हाण,उपमुकाअ राजकुमार पुराम,उपमुकाअ राजेश बागडे,उपमुकाअ राजेश देशमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.हरीष कळमकर,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख ,अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.