सोनिया-राहुल-मनमोहनसिंगाना अटक व सुटका

0
6

नवी दिल्ली – काँग्रेसने जंतर-मंतर येथे रॅलीचे आयोजन केले. यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ‘देशात दुष्काळ पडला आहे. दररोज 50 शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र पंतप्रधान काहीही करु शकत नाहीत.’

त्यांनी म्हटले होते की युवकांना रोजगार देणार, मात्र मेक इन इंडियाचा बीग शो झाला पण लोकांना रोगार मिळाला नाही. 2015 मध्ये केवळ 1.30 लाख लोकांच्या हाताला काम मिळाले.
केंद्र सरकारने गैर भाजप आणि काँग्रेसचे राज्य असलेल्या राज्यांमध्ये सुरु केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर राहुल गांधी म्हणाले, ‘हा लोकशाही देश आहे. आम्ही लोकशाहीसाठी लढणार आहोत. गरीबांसाठी लढणार आहोत.’

रॅली संपल्यानतंर काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार संसद भवनात जातील असे ठरले होते. त्यानुसार काँग्रेस अध्यक्षा सनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह दोन्ही सभागृहातील खासदार संसदेकडे जात असताना त्यांना कोर्ट अरेस्ट करण्यात आले. संसद भवन परिसरात कायम कलम 144 लागू असते. जमावबंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी सोनिया, राहुल , मनमोहनसिंगांना कोर्ट अरेस्ट करण्यात आले.