माजी मुख्यमंत्री अजित जोगीनी सोडली कॉंग्रेस

0
13

वृत्तसंस्था

रायपूर,दि.2- छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ट नेते अजित जोगी यांनी आज (गुरुवार)  कॉंग्रेस पक्ष सो़डत असल्याचे तसेच लवकरच ते नवीन पक्षात प्रवेश करणार असल्याचे जोगी यांनी सांगितले. 

पत्रकारांशी बोलताना जोगी म्हणाले, ‘पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी अनेक नागरिकांशी चर्चा केली आहे. कॉंग्रेस पक्ष हा नेहरू व राजीव गांधी यांचा पक्ष आता राहिलेला नाही. पक्षाला काम करणाऱयांची किंमत नाही. छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांची ‘बी-टीम‘ आहे. लवकरच नवीन पक्षात प्रवेश करणार आहे.‘