एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका – पृथ्वीराज चव्हाण

0
12

कोल्हापूर,दि.2- राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम यांच्यातील कॉलप्रकरण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंना राज्याच्या मंत्रिमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर तोफ डागली.

महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दाऊद इब्राहिमचा फोन येणे हा प्रकार अतिशय गंभीर आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असून केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरुन द्यावं, असे ते म्हणाले.