ग्राहकच्या अध्यक्षपदी केशव बुरडे व उपाध्यक्षपदी सुरेश कश्यप

0
16

भंडारा : जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था भंडाराच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक ३१ मे रोजी संस्थेच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षपदी पवनीचे संचालक केशव बुरडे तर आमगावचे संचालक सुरशे कश्यप यांची उपाध्यक्षपदी यांची निवड संचालकांनी केली.
पतसंस्थेच्या निवडणुकीत अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे व गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित यांच्यासहकार पॅनलने दणदणीत विजय संपादित करित १९ संचालकापैकी १२ संचालक निवडून आणले. इतर पॅनलला ७ संचालकांवर समाधान मानावे लागले होते. ३१ मे रोजी संस्थेच्या सभागृहात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली. अध्यक्ष पदासाठी केशव बुरडे यांना १३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी दिनेश घोडीचोर यांना केवळ ४ मते मिळाली. २ मते अवैध ठरली. उपाध्यक्षसाठी सुरेश कश्यप यांना १२ मते मिळाली. प्रतिस्पर्धी उमेदवार नामदेव गभने यांना ५ मते मिळाली तर २ मते अवैध ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी एच.डी. कुहीकर यांनी केशव बुरडे व सुरेश कश्यप यांना विजयी घोषित केले. सर्मथकांनी गुलाल व फटाक्यांची आतिषबाजी करित जल्लोष व्यक्त केला. त्यानंतर झालेल्या विजयी सभेच्या अध्यक्षस्थानी रमेश सिंगनजुडे होते. यावेळी मनोज दीक्षित, रमेश काटेखाये, सुभाष मेमन,एल.यु.खोब्रागडे,किशोर डोंगरवार,रुपचंद निर्वाण, शंकर नखाते, अशोक ठाकरे, तुळशीदास पटले, रविराज उगलमुंगले, सुरेंद्र उके, यशपाल बगमारे, पी.टी. हातझाडे, कोमल चव्हाण, अरुण बघेले, नवनिर्वाचित संचालक रूपेश कुमार फटे, नेपाल तुरकर, रामेश्‍वर कांबळे, बी.जी. भुते, भागवत मदनकर, दिलीप सोनुले, विनोद भेंडारकर व सभासद, संघटनाचे पदाधिकारी हजर होते. मतदान प्रक्रियेत संचालक गणेश साळुंखे, नामदेव गभने, किशोर ईश्‍वरकर, दिनेश घोडीचोर, दिलीप ब्राह्मणकर, केशव बुरडे, विलास टिचकुले, देवराम थाटे, विजयकुमार डोये, सुरेश कश्यप, नूतन बांगरे, परमानंद पारधी, शैलेश बैस, अविनाश शहारे, विनोद राठोड, संध्या गिर्‍हेपुंजे, दीक्षा फुलझेले, मुलंचद वाघाये, दिलीप ब्राह्मणकर यांनी मतदान केले.