संघप्रमुखांनी नाकारली नाथाभाऊंची भेट ?

0
9

विशेष प्रतिनिधी

गोंदिया/नागपूर- राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांचा लेखाजोखा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे सुपूर्द केला.त्यानंतर  पद वाचवण्यासाठी एकनाथ खडसे यांनी आज नागपूर गाठून राष्टीय स्वयसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता होती. पण भागवत यांच्याकडून भेटीला परवानगी न मिळाल्याने ही भेट नाकारल्याची चर्चा जोमात सुरु झाली आहे.संघाचेही आशिर्वाद नाथाभाऊंच्या वरुन हटले असे बोलले जात आहे.

महसूलमंत्री एकनाथ खडसे गेल्या चार दिवसांपासून आपल्या गावी मुक्ताईनगरमध्ये मुक्कामी आहे. दिल्ली घडलेल्या घडामोडीनंतर खडसे आज नागपूरला रवाना होणार होते. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार होते. पण भागवत यांची भेट आज होण्याची शक्यता जवळपासच नाहीय.  नागपुरात संघाचा तृतीय वर्ष अभ्यास वर्ग सुरू आहे. या अभ्यास वर्गाला भागवत हजर आहेत. भागवत यांनी आज दिवसभरात खडसेंना भेटीची वेळ दिली नाही. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही आज मुंबईत आहेत. त्यामुळे खडसेंची गडकरींसोबत आणि मोहन भागवत यांच्यासोबत भेट होणार नाही हे जवळपास निश्चित आहे.