बहुजन असल्यानेच खडसेंवर अन्याय – राणे

0
9

मुंबई – एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांचे प्रकरण भाजपने व्यवस्थित हाताळले नसून, भाजपकडून बहुजन समाजातील नेत्यांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला आहे.

पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी कथित संभाषण व भोसरी जमीन गैरव्यवहारामुळे प्रचंड अडचणीत आलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (शनिवार) अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपला मंत्रीपदाचा राजीनामा सूपूर्त केला. या राजीनाम्यावर बोलताना राणेंनी खडसेंची पाठराखण केली आहे.