मंत्रिमंडळ विस्तार १६ जूनला?

0
12

मुंबई- भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यामुळे काहीसा लांबणीवर पडलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या १६ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

यासाठी भाजपाच्या बड्या नेत्यांत राजधानी नवी दिल्लीत खलबते सुरू असून लवकरच त्याबाबतची घोषणा होणार आहे. सत्तेत येण्यापूर्वी मित्रपक्षांना आश्वासन देऊन फडणवीस सरकारने अद्याप त्यांना सत्तेत स्थान दिलेले नाही.

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आदी घटक पक्षांच्या प्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.