गोरेगावात काँग्रेस पदाधिकार्यांची बैठक

0
11

गोरेगाव,दि.18: तिरोडा विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्ष बळकट कसे करता येईल, याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव उमाकांत अग्निहोत्री यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

अध्यक्षस्थानी गडचिरोली (आरमोरी) विधानसभा क्षेत्राचे पर्यवेक्षक डॉ. योगेंद्र भगत होते. याप्रसंगी प्रामुख्याने माजी अध्यक्ष अ‍ॅड.के.आर. शेंडे, डॉ. झामसिंग बघेले, डॉ. नामदेवराव किरसान, पी.जी. कटरे, जगदिश येरोला, मलेशाम येरोला, विशाल शेंडे,नगराध्यक्ष सीमा कटरे, ज्योती वालदे, हिरण झंझाड,तालुका अध्यक्ष डेमेंद्र रहांगडाले, ओमप्रकाश कटरे, ससेंद्रकुमार भगत, अ‍ॅड. पृथ्वीराज चव्हाण, अशोक शेंडे, राहुल कटरे व पदाधिकारी उपस्थित होते.

तिरोडा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या जिल्हा परिषद क्षेत्र, पंचायत समिती क्षेत्रातील गावांना भेटी देवून गावाच्या समस्या सोडविणे, पक्ष बळकट करण्यासाठी गाव संघटन तयार करणे, तालुक्यात युथ काँग्रेस कमिटी, विद्यार्थी संघटना, महिला काँग्रेस कमिटी तयार करणे व हे संघटन येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी करावयाचे आहे. यासाठी काँग्रेसचे शिपाई म्हणून काम करणार, अशी ग्वाही उमाकांत अग्निहोत्री यांनी बैठकीत दिली.

संघटन मजबूत करण्यासाठी दर आठवड्याला जि.प. व पं.स. क्षेत्रनिहाय बैठका घेतल्या जाणार असल्याने सामान्य कार्यकर्त्यात नवसंजीवनी देण्याची कामे पदाधिकारी व नेत्यांना करावयाचे आहेत. काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष आहे. यासाठी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. दमदार काँग्रेस पक्ष झाल्याशिवाय खासदार, आमदार निवडता येणार नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्याच नावांनी पक्ष बळकट करण्याचे कार्य सर्व पदाधिकाऱ्यांनी करावे, असे आवाहनसुद्धा तिरोडा विधानसभा क्षेत्र प्रभारी उमाकांत अग्निहोत्री यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना केले. संचालन के.टी. राऊत यांनी केले. आभार सुरेश चन्ने यांनी मानले. बैठकीच्या यशस्वितेसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.