आमदार जाधवचा प्रताप, लगावली पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

नागपूर: शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिस अधिकाऱ्याच्या कानशिलात मारण्याचा प्रताप केला आहे. नागपुरात आमदार जाधव यांनी हा पराक्रम गाजवला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटू न दिल्याने, आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली.आमदार हर्षवर्धन जाधव हे औरंगाबादमधील कन्नड मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. उद्धव ठाकरे हे नागपुरात आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आमदार जाधव हे उद्धव ठाकरे ज्या हॉटेलमध्ये आहेत, तिथे गेले होते. मात्र याठिकाणी त्यांना पोलिस अधिकाऱ्याने अडवल्यामुळे, जाधव यांनी थेट पोलिसाच्या कानशिलात लगावली.
पोलिस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांचा हा पहिलाच राडा नाही. यापूर्वी पोलिसांनी आमदार जाधव यांना जबर मारहाण केली होती. त्यावेळी जाधव हे राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये होते.