30.2 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home राजकीय नोकऱ्या देत नसाल राजीनामा द्या- उद्धव ठाकरे

नोकऱ्या देत नसाल राजीनामा द्या- उद्धव ठाकरे

0
30

पणजी, वृत्तसंस्था दि. 1 – रेल्वेत नोकरभरतीची मागणी पूर्ण करणे शक्य नसेल तर सुरेश प्रभू यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव यांनी केली. मराठी तरुणांवर झालेल्या लाठीहल्ल्याबाबत त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बुलेट ट्रेनची स्वप्ने नको, आधी नोकऱ्या द्या. आजपावेतो भकडकथा भरपूर ऐकल्या. जमत नसेल तर प्रभू यांनी मंत्रिपद सोडावे. उद्धव म्हणाले की, दिल्लीत ज्या मराठी युवकांवर लाठीहल्ला झाला त्यांच्याबाबत सेनेला सहानुभूती आहेच. शिवसेनेचे खासदार खैरे, अडसूळ संसद मार्ग पोलीस स्थानकात सर्वप्रथम पोहोचले आणि त्यांनी या युवकांची विचारपूस केली.भाजपावर हल्लाबोल करताना ते शिडीसारखा वापर करतात, आणि माडीवर चढल्यावर शिडीवर लाथ मारतात, असे म्हटले आहे. लाचारी पत्करुन आम्हाला सत्ता नको असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर गोव्यात भाजपने मगोपला संपविण्याचा डाव रचल्याचा आरोपही केला.