प्रजासत्ताकदिनी मुरमाडी/तूप येथे ओबीसीवर व्य़ाख्यानमाला

0
7

लाखनी,दि.01-ओबीसी सेवा संघ लाखनीच्या वतीने मुरमाडी/तूप. येथे “भारतीय प्रजासत्ताकाच्या 67 वर्षात ओबीसी प्रवर्गाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सद्यस्थिती: काल, आज आणि उद्या” या व्याख्यानमालेचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्यसाधून आयोजन करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भैयासाहेब लांबट होते. तर जिल्हा परिषद भंडाराच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई गिल्लोरकर प्रामुख्याने उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून प्रा.श्री. आकरे साहेब, ओबीसी सेवा संघाचे भंडारा जिल्हा सरचिटनीस प्रा.डॉ.अमित गायधनी, ओबीसी सेवा संघ लाखनीचे संघटक मंगलमूर्ति किरणापुरे, ज्येष्ठ ओबीसीवादी कार्यकर्त्या सुनीताताई हमे, ओबीसी सेवा संघ लाखनीचे अध्यक्ष प्रा.उमेश सिंगनजुडे उपाध्यक्ष प्रा.अशोक गायधनी यावेळी मंचावर उपस्थित होते. सर्व वक्त्यांनी ओबीसी समाजाची सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक स्थिती, ओबीसी आरक्षण तसेच संविधानिक अधिकार या विषयावर आणि बहुजन चळवळीविषयक विचार मांडले.नियोजन सुनील चाफले यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल हटवार आणि आभार प्रदर्शन प्रशांत वाघाये यांनी मानले.