कर्जमाफीचे शरद पवारांकडून सावध स्वागत; निकष, तत्वतः आणि सरसकट या शब्दांवर शंका

0
14
औरंगाबाद,दि.11 – शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी 30,500 कोटी रुपये लागणार आहेत. सरकारने घोषणा केली म्हणजे तेवढी तरतूद केलीच असेल असे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सांगितले. सरकारसाठी ही रक्कम काही मोठी नाही, ते एका दिवसात देतील. सरसकट कर्जमाफीची आणि उद्यापासून नवीन कर्ज देण्याची महसूल मंत्र्यांनी घोषणा केली. ती स्वागतार्ह असून माझा चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास असल्याचे पवार म्हणाले आहेत.
राज्य सरकारच्या मंत्रिगटाने कर्जमाफीची घोषणा केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर आले. याचवेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून सरकारने कर्जमाफीची घोषणा करताना उल्लेख केलेल्या निकष, तत्वतः आणि सरसकट या शब्दांवर शंका या शब्दांवर शंका व्यक्त केली.