फडवणीस सरकार नसुन फसवणीक सरकार- प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण

0
15

नांदेड,दि.14:-राज्यामध्ये सरकार हे केवळ शेतकरी व जनतेची दिशाभुल करून शेतक-यांची कर्ज माफीची घोषणा केवळ फसवेगीरी असुन सरकारचा जि.आर. हा रोजच बदलत असुन महाराष्ट्राचा  34 हजार कोटी शेत-यांचे कर्ज माफ नसुन नियमानुसार केवळ पाच हजार कोटी शेतक-यांचे कर्ज जि.आर. प्रमाणे माफ होत असल्याने राज्याचे सरकार हे शेतकÚयांची फसवणुक करीत असुन ते फडवणीस सरकार नसुन फसवणीक सरकार असल्याचे मत काॅग्रसेचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषेदत व्यक्त केले.यावेळी माजी राज्यमंत्री डि.पी. सांवत, आ.अमरभाऊ राजुरकर,उमाकांत अग्नीहोत्री,नागेश पा.शिंदे,नामदेवराव केशवे,बि.आर.कदम,उपमहापौर अहमद कुरेशी,माजी महापौर अब्दुल सत्तार,नगरसेवक विनय येवनकर,संतोष पांडागळे,माजी उपमहापौर आनंद चव्हाण अादी उपस्थित होते.
पुढे बोलतांना म्हणाले की राज्य शासनाने नुकतीच कर्ज माफी केली असुन राज्यातील 34 हजार कोटी शेतक-यांचे कर्ज माफ केल्याचा दावा सरकार करत आहे.मात्र केवळ पाच हजार कोटीचे शेतक-याचे कर्ज माफ झाले आहे.बाकी सर्व शेतकरी कर्जबाजारी आहेत आमची मागणी ही सरसकट शेतक-यांचे कर्ज माफ करा.सर्वांचा सातबारा कोरा झाला पाहिजे,मात्र फडवणीस सरकारने जि.आर. तयार
करून त्यामध्ये 2016 चा उल्लेख करून त्याचे कर्ज माफ करा असा होता.परंतु 30 जुन 2017 पर्यन्तचा शेतक-यांचे कर्ज माफ करा अशी आमची मागणी आहे.कर्जमाफी मध्ये पुर्नगठन शेतक-यांना कर्ज माफीचा फायदा नाही.या सरकारच्या विरोधात आणि सर्वच तालुका गावपातळीवर कर्जमाफ झाले नाही.अशा शेतक-याचे करून फार्म भरून ते तहसिलदारांना देणार असुन त्याची प्रत आम्ही मुंबईच्या विधीमंडळाच्या अधिवेशनात मांडुन आवाज उठवणार असल्याचे सांगितले.सरकारने अल्पभुधारक शेतक-यांना दहा हजार कर्ज त्वरीत देण्यासाठी सांगितले.बॅकांनी दहा हजार कर्ज दिले नाही. त्यामुळे शेतक-यांच्या रांगा बॅकामुळे दिसत आहेत.देशात व राज्यात अल्पसंख्याक व  दलीतावर अत्याचार वाढले असुन केवळ गोरक्षणाच्या नावावर अनेक जनसामन्यावर अत्याचार करीत आहेत.खुद मुख्यमंत्री फडवणीस यांच्याच नागपुर येथे घटना घडली असुन ती घटना निदंनिय आहे दिवसेंदिवस अशा घटना मध्ये वाढ होत असल्याने कायदा सुरक्षेचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात निर्माण झाल्याचे चव्हाण म्हणाले.जि.एस.टी बाबत आम्ही सर्वच व्यापाचांशी चर्चा करून त्याचे मतभेद जानुन घेणार असुन येणा-या 22 जुलैला पुणे येथे पि. चिंदबरम यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात व्यापा-यांचा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी या पत्रपरिषदेत सांगितले.शिवसेना ही दुप्पटी भुमिका घेत असुन ते सरकार मधुन बाहेर ही निघत नाही आणि विरोधी बाकावरही बसत नाही. ढोल ताशा वाजवुन बॅँकापुढे काही फरक पडणार नाही असा टोलाही मारला.