ओबीसी प्रश्न आक्रमकपणे मांडा-राहुल गांधी

0
18

नागपूर,दि.२३-ओबीसी समाजाकडे १९९० नंतर करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे पक्षावर गंभीर स्थिती ओढवल्याची कबुली काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी देशभरातील काँग्रेस पक्षाच्या ओबीसी नेत्यांशी दिल्ली येथील निवासस्थानी चर्चा करताना दिली.गांधी यांनी देशभरातील १६५ प्रतिनिधी बैठकीसाठी बोलावले होते. यात महाराष्ट्रातून विधान परिषदेतील उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभेतील पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, खासदार राजीव सातव,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्राचार्य बबनराव तायवाडे, नितीन कुंभलकर यांच्यासह राज्यातील ३३ प्रतिनिधी उपस्थित होते.
इंदिरा गांधी यांच्या काळात ओबीसींना फार महत्व होते. समाजाकडे हळूहळू दुर्लक्ष झाले. १९९० नंतर या समाजाची विशेष दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे ओबीसींचे प्रश्न आक्रमकपणे मांडा,अशी सूचना गांधी यांनी केली. दरम्यान प्राचार्य तायवाडे यांनी ओबीसी समाजासोबत होत असलेल्या अन्यायाचे निवेदन सोबतच सध्या सुरु असलेल्या वैद्यकिय प्रवेशात ओबीसीना देण्यात आलेल्या २ टक्के आरक्षणाची सविस्तर माहिती निवेदनाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना देऊन आतापर्यंत करण्यात आलेल्या कार्याची व मागण्यांची माहिती दिली. ओबीसी समाजाची जनगणना व्हावी हा मुद्दा आणखी जोमाने रेटण्यात यावा, असे मतही तायवाडे यांनी व्यक्त केले.केंद्रात स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, मंडल आयोग, नच्चीपन आयोग व स्वामीनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या, घटनाबाह्य नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, ओबीसींच्या रिक्त जागा भरण्यासाठी स्वतंत्र अभियान राबवावे, ओबीसी कर्मचाèयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात यावे, ओबीसींसाठी विधानसभा व लोकसभेसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात यावा, ओबीसी शेतकèयांना वनहक्क पट्ट्यासाठी लावलेली तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, आदी मागण्यांकडे प्राचार्य तायवाडे यांनी राहुल गांधी यांचे लक्ष वेधले. येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाèया ओबीसी अधिवेशनाची माहितीही देण्यात आली.