भाजपप्रती जनतेचा मोहभंग-आमदार अग्रवाल

0
19

गोंदिया,दि.05 : जनता आता भारतीय जनता पक्षाच्या खोट्या आश्वासनांनी त्रस्त झाली आहे. आता त्यांना आपल्या क्षेत्रात विकास हवा आहे. यामुळेच समझदार जनतेने भापजला त्यांची जागा दाखवून दिली. भाजप प्रती जनतेचा मोहभंग झाला असून कॉंग्रेस पक्षाला मिळालेले यश हेच त्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजीत कार्यकर्ता संमेलन व नवनिर्वाचित सरपंच-सदस्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, कॉंग्रेसने जनतेला कधीही १५ लाख रूपये देण्याचे, एका शहीद जवानाच्या बदल्यात १० पाकीस्तानी जवानांना मारण्याचे खोटे आश्वासन दिले नाही. जीएसटी व नोटबंदी लावून जनतेला अडचणीत आणले नाही. पेट्रोल, सिलींडर, वीज दरवाढ करून जनतेच्या खिशांवर डल्ला मारला नाही. यामुळेच ग्रामपंचायत निवडणुकीत ७० पैकी सुमारे ५० ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस पक्षाचे ३० हून अधीक सरपंच व सुमारे ३०० सदस्य निवडून आले असल्याचे सांगीतले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे ,कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे यांनीही विचार व्यक्त केले.संचालन महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार तालुकाध्यक्ष प्रकाश् रहमतकर यांनी मानले.

याप्रसंगी ग्राम धामनेवाडा सरपंच रजनी बोपचे, दांडेगाव सरपंच बेबीनंदा चौरे, खळबंदा सरपंच ज्योती कांबळे, कारंजा सरपंच धनवंता उपराडे, लंबाटोला सरपंच योगराम ठाकरे, दतोरा सरपंच उर्मिला महारवाडे, खातीया सरपंच सेवंता तावाडे, पांजरा सरपंच चेतन नागपूरे, रापेवाडा सरपंच जीवन चव्हाण, सिवनी सरपंच धुर्वराज उके, अंभोरा सरपंच चिंतामन चौधरी, बरबसपुरा सरंच गितावंती नागपूरे, टेमनी सरपंच खेलन टेकाम, बडेगाव सरपंच योगिता पाचे, कटंगीकला सरपंच प्रतिभा डोंगरवार, बिरसी सरपंच इंदू वंजारी, झिलमिली सरपंच राधीका कावडे, ढाकणी सरपंच नामदेव सहारे, जब्बारटोला सरपंच वच्छला चिखलोंडे, रतनारा सरपंच रेखा चिखलोंडे, दासगाव सरपंच रानू नशिने, बिरसी सरपंच शिला कुंजाम, मुरदाडा सरपंच दयाराम आगाशे, लहीटोला सरपंच दिनेश तूरकर, देवूटोला सरपंच रामेश्वर हरिणखेडे, सतोना सरपंच धनवंती मानकर, नवेगाव सरपंच मदनलाल सयाम, आसोली सरपंच भागरता धुर्वे यांच्यासह सदस्य तसेच अन्य कित्येक गावांतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला.