पंतप्रधान मोदींचे ‘ओबीसी’ जात प्रमाणपत्र गुजरातमध्ये जाऊन तपासणार- नाना पटोले

0
8

नागपूर,दि.09(विशेष प्रतिनिधी) – देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात 42 टक्के वाढ झाली आहे. मोदींनी शेतकरी प्रश्नावर आणि ओबीसीच्या मुद्दयांवर माझ्यासोबत वाद घातला होता. मोदी हे खरच मागास जातीचे आहे काय याची मी गुजरातमध्ये जाऊन शहानिशा करणार आहे. त्यांच्या पापाचे भांडे फोडणार, असे वक्तव्य खासदारकीचा राजीनामा देणारे खासदार नाना पटोले यांनी केले आहे.ते आज नागपूरात जय जवान जय किसान च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत श्री डांगे,जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यप्रणालीला विरोध करत शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आता गुजरात निवडणुकीच्या मैदानात उतरून ते मोदींविरोधात प्रचार करणार आहेत. मात्र, त्यांनी अद्याप आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे म्हटले आहे.पटोले म्हणाले, की मी 11 तारखेला राहुल गांधींसोबत सभेत गुजरातमध्ये सहभागी होणार आहे. मी कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. माझ्या जागेवर निवडणूक होईल की नाही हे माहित नाही. दानवे हे फार महान आहेत मी शेतकऱ्यांच्या प्रती बहुजनांसाठी राजीनामा दिला. दानवे आपली खुर्ची वाचवण्यासाठी बोलले असतील. केंद्र सरकारमध्ये जे चाललंय ते संविधानिक व्सवस्थेसाठी चांगले नाही. नोटबंदी हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. राहुल गांधी यांचे व्हिजन चांगले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर ही राजीनामा देण्याची वेळ आली नसती.

”भाजपच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने, मी पापाच्या व्यवस्थेपासून मोकळा झालो आहे. मी आता त्यांच्या पापाचे भांडे फोडणार आहे, मोदींनी गुजरात निवडणुकीत मागास जातीचा मुद्दा पुढे केल्यानेच मी राजीमाम्यासाठीही जाणिवपूर्वक कालचा दिवस निवडला असेही पटोले म्हणाले.पंतप्रधानांच्या दबावामुळेच वेगळ्या विदर्भाचे बील संसदेत येऊ शकले नाही, असेही पटोलेंनी सांगितले.